मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०१४

छत्रपती शिवराय

****** छत्रपती शिवाजी महाराज की जय ******
             || जय भवानी ... जय शिवाजी .. ||






Bhosale family ancestry Chhatrapati Shivaji (1630-1680) Chhatrapati Sambhaji (1657-1689) Chhatrapati Rajaram (1670-1700) Queen Tarabai Chhatrapati Shahu (alias Shivaji II, son of Chhatrapati Sambhaji) Chhatrapati Ramaraja (nominally, grandson of ChhaShivaji's night attack on Shaista Khan, the Mughal Governor of the Deccan in Pune, in midst of his military camp (5th April 1663)


स्वराज्यावर चालून आलेला अफजलखाना सारखा मातब्बर व बलाढ्य शत्रू , छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखाने मारल्यामुळे “वाघनखं” हे हत्यार इतिहासात अमर झाले, तसेचजनसामान्यांच्या कुतूहलाचा विषय ठरले.
त्यापूर्वी १७ व्या शतकात वाघनखाला शस्त्र म्हणून अधिकृतमान्यता नव्हती. त्याकाळी ते डाकू व दरोडेखोरांचे हत्यार म्हणून ओळखले जात असे.
वाघनखं हे प्रामुख्याने भारतातविकसित झालेले, सहज वाहून नेण्याजोगे व स्वसंरक्षणासाठी वापरले जाणारे शस्त्र आहे. वाघनखासारखी वेगळी व शत्रूला चकीत करणारी हत्यारे बनविताना त्या-त्या प्राण्यांच्या पंजाचा, वार करण्याच्या पध्दतीचा अभ्यास केला जात असे. वाघनखांप्रमाणेच अस्वली कट्यार, सिंहाचा पंजा अशी हत्यारे मध्ययुगात अस्तित्वात होती, पण त्यांना वाघनखांप्रमाणे प्रसिध्दीचे वलय लाभले नाही.
वाघनखं हे लोखंडापासून बनविलेले शस्त्र असून धातूच्यापट्टीवर चार धारदार, टोकदार, अर्धवर्तुळाकार (आतल्या बाजूस वळलेली) धातूची नखे असतात. ही नखं ज्या धातूच्या पट्टीवर बसवलेली असतात, त्या पट्टीच्या दोन टोकांना अंगठीसारख्या कड्या असतात. या कड्या पहिल्या बोटात व करंगळीत अडकवून मूठ बंदकेल्यास वाघनखं हातात बेमालूमपणे लपून जात.
वाघनखांची रचना ही खास कातडी फाडून स्नायूंना टरकावण्यासाठी केलेली आहे. वाघनखाने शत्रूला पूर्णपणे मारणे शक्य नसले तरी त्याला जखमी करून नामोहरम करता येत असे. वाघनखं शत्रूच्या पोटात खुपसल्यावर बाहेर काढणे कठीण असे. वाघनखं शरीरात खुपसल्यावर अत्यंतिक वेदनेमुळे शत्रू दूर जाण्याचा प्रयत्न करतो आणि याचमुळे वाघनखं जास्त खोलवर जाऊन नुकसान करतात. महाराजांनी अफजलखानाच्या पोटात वाघनखं खुपसल्यावर प्रतिक्षिप्त क्रियेने अफजलखानाने महाराजांपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला त्यामुळे वाघनखं त्याच्या पोटात जास्त खोलवर घुसून पोट फाटले व आतडी बाहेर आली.
वाघनखांचा उपयोग शत्रूवर हल्लाकरणे याव्यतिरिक्त डोंगरकपार्‍या, किल्ल्याच्या भिंती तसेच झाडावर चढणे उतरणे यासाठी होत असे.
सिंहाचा पंजा: या शस्त्रात सिंहाच्या नखांसारखीच धातूची नखे असलेली पट्टी असते. पंजाच्या मागच्या बाजूस असलेलीधातूची पट्टी मनगटावर घट्ट बसते व नखे असलेली पट्टी बोटांच्या खालच्या बाजूस येते. या रचनेमुळे शस्त्रावर घट्ट पकड बसते, तसेच वार करणारा नखांचा भाग बोटांखाली लपल्यामुळे शस्त्र सहजासहजी शत्रुला दिसत नाही. या शस्त्राचा उपयोग ठोसा देणे, वारकरणे, ओरबाडणे यासाठी होतो.
अस्वली कट्यार: याला अस्वलाचा पंजाही म्हणतात. याची पकड कट्यारीसारखीच असते, पण पुढच्या बाजूस पात्या ऐवजी अस्वलाच्या नखांसारखी धातूची नखे असतात. या शस्त्राचा वापर वार करणे व फाडून ओढणे यासाठी करतात.
————— ————— ——–
कट्यार हे मध्ययुगीन भारतीय उपखंडात प्रचलित असलेले पात्याचे शस्त्र होय. हिला ‘एच’ या रोमन अक्षराच्या (रोमन: ‘H’) आकारातली मूठ असते; जेणेकरून शस्त्रधारकाच्या मूठ आवळलेल्या बोटांवरून हिचे पातेसरळ फुटल्यासारखे दिसते. हिच्या संरचनेमुळे लक्ष्याला भोसकण्यासाठी हिचा वार करता येतो.
समारंभप्रसंगी गौरवचिन्ह म्हणूनही हिला महत्त्वाचे स्थान आहे.
कट्यार हे मराठा पध्दतीचे शस्त्र आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आवडते शस्त्र होते. त्यांच्या कमरेला शेल्यामध्ये कट्यार नेहमीच असायची. छत्रपती शिवाजी महाराजांचा असा दंडक होता की, प्रत्येक सैनिकाजवळ तलवार, ढाल या प्रमुख शस्त्रांबरोबर एक छोटे शस्त्र असले पाहिजे, जसे शेल्यामधील कट्यार, अथवा अस्तनीमध्ये बिचवा. युध्दात वेळप्रसंगी हे शस्त्र वापरता येत असे.
कट्यार हे छोट्या शस्त्रांपैकीसर्वात प्रभावी शस्त्र आहे; त्यामुळे त्याला भारतभर प्रसिध्दी मिळाली व वेगवेगळ्याराज्यकर्त्यांनी आपल्या कारागिराकडून कट्यारी बनवून घेतल्या. त्या कट्यारींवर त्या-त्या प्रदेशांची छाप पडली व कट्यारीचे अनेक प्रकार तयार झाले. राजा, राणी व दरबारातील मान्यवर सतत आपल्याबरोबर कट्यार बाळगत असत. कट्यारीची लांबी १० इंच ते २० इंच च्या दरम्यान असते. कट्यारीचे पाते, नख्या व मूठ हे तीन भाग असतात. हे तीनही भाग अखंड धातूमध्ये ओतून कट्यार बनविली जाते. काही कट्यारींमध्ये हे तीनही भाग रिव्हेटने एकत्र जोडलेले असतात.
कट्यारीचे प्रकार:
१) मराठा कट्यार:- १० ते २० इंच लांबीची अखंड ओतीव असते, तिचा अर्धाभाग पकडण्यासाठी असून हाताचे संरक्षण करण्यासाठी दोनउभ्या पट्‌ट्या असतात.
२) मुघल कट्यार:- पाते, नख्या, मूठ असे कट्यारीचे तीन भाग रिबेटने जोडलेले असतात पाते बहुतांश:तलवारीच ेच वापरतात नख्या व मूठ यांच्यावर नक्षीकाम केलेले असते.
३) हैद्राबादी कट्यार:- याचे पाते लांब व रुंद असते ते पातळ पत्र्याचे बनविलेले असते. या कट्यारीत हाताचे संरक्षण करण्यासाठी मूठीवर संरक्षण कवचअसते, त्यामुळे मनगटापर्यंत हाताचे संरक्षण होते. हैद्राबादी कट्यारी १५ इंचापासून २५ इंचापर्यंत लांब असतात

४) मानकरी कट्यार:- शोभिवंत, मजबूत, जाडजूड व सोन्या चांदीचेनक्षीकाम केलेली असते.
५) सैनिकांची कट्यार:- साधी पण मजबूत असते.
६) स्त्रिया व मुले यांची कट्यार:- स्त्रिया व मुलांसाठी लहान आकाराच्या, कमी वजनाच्या शोभिवंत कट्यारी बनवल्या जात.
कट्यारीचे इतर प्रकारही आहेत जसे, जंबीया, खंजीर, खंजराली, पेशकबज इत्यादी.
चिलखत भेदी कट्यार
एक संहारक अस्त्र म्हणुन देखिल कट्यार वापरली जावु शकते ….हा एक कट्यारीचा उत्तम प्रकार असुन या कट्यारीत पात्याच्या टोकाकडील भागाजवळ पात्याची जाडी (रुंदी) जास्त असते ..पाते किंचित फ़ुगलेले असते ..त्यामुळे पात्याला जास्त ताकद मिळते .अशीकट्यार चिलखत देखिल फ़ाडुन आत वार करते ..
यांच्या पात्याच्या टोका जवळील(टिप) भाग वेगवेगळा असतो ..

wagh-nakhe-chikhalat-Chilkhat
वाघनखं आणि चिलखत
कधी कधी युद्धा मध्ये तुटलेल्या तलवारींची पाती देखिल वाया न घालावता त्यापासुन देखिल कट्यारी बनवल्या जात होत्या ..तुटलेल्या पात्यांना कट्यारीची मुठ बसवुन..हत्यार पुर्ण केले जात असे..म्हणुनच बरेच दा आपल्याला पात्याची कमी अधिक उंची कट्यारी दिसतात ..
हैदराबादच्या एका व्यक्ती सोबत मराठ्यांच्या पराक्रमांवर चर्चा झाली.त्या व्यक्तीने चर्चेदरम्यान एक गोष्ट अशी विचारली की,मराठे लपून हल्ला करायचे का? मैदानातून पळून जायचे का? मराठे लुटारू होते का? तो म्हणाला की आम्ही असे ऐकले आहे की मराठे लपूनछपून यायचे,लपून छपूनच हल्ला करायचे आणि लुटून पळून जायचे,खुल्या मैदानात मराठे यायला घाबरायचे.

मला त्याच्या बोलण्याचा अजिबात राग आला नाही कारण आपल्या देशात ...खो
ट्या इतिहासाच्या प्रसाराने अशा बऱ्याच अंधश्रद्धा मराठ्यांच्या बाबतीत पसरल्या आहेत.त्या व्यक्तीला मी सांगितले की लपून छपून हल्ला करून,अचानकपने आश्चर्याचा धक्का देणे, काही कळायच्या आत शत्रूला संपविणे हा मराठ्यांच्या गनिमी काव्याचा भाग होता.
आणि गनिमी कावा हा कमीत कमी सैन्य कामी आणून यश मिळविण्याचा एक मार्ग होता.

कारण प्रत्त्येक सैनिकाचा जीव महत्वाचा वाटायचा आमच्या राजाला. तरी तो व्यक्ती काहीना काही म्हणून मराठे असे होते,मराठे तसे होते असा म्हणायचा.त्यामुळे मी त्याला सरळ त्याच्या हैदाराबाद्चेच उदाहरण दिले.त्याला सांगितले की छ.शिवाजी महाराज नावाचा मराठा आपली अवाढव्य फौज घेऊन हैदराबाद मध्ये आला होता.

ती फौज तुमच्याच गोलकोंडा फोर्टमध्ये तशीच सोडून कोणताही अंगरक्षक सोबत न घेता तुमच्याच राजाच्या घरात भेटीसाठी गेला होता,महिनाभर राहिला आणि अशावेळी तुमचाच राजा घाबरला होता,कारण आपला राजा दिसत नाही म्हणून मराठा फौजेने हैदराबाद संपविण्याची योजना बनविली होती.

तेव्हा घाबरून तुमच्याच राजाने छ.शिवरायांना विनंती केली होती की कृपा करून आपल्या सैन्याला शांत करा.आणि तसे झालेसुद्धा.आपले छत्रपती दिसले तेव्हा मराठे शांत झाले होते.एवढेच काय तुमच्या राजाचा अवाढव्य,भयावह हत्ती येसाजी कंक नावाच्या मराठ्याने एकट्यानेच संपविला होता आणि सिद्ध केले होते की एक मराठा हत्तीच्या ताकदीचा असतो.उदगिरीच्या लढाईत जी लढाई खुल्या मैदानात झाली होती.

त्याच लढाईत इब्राहीम गार्दी सारखा तोफखान्याचा प्रमुख समोर असतांनासुद्धा थोड्याशा तोफ्खान्यासह मराठेच जिंकले होते.स्वाल्हेरच्या लढाईत खुल्या मैदानात ४०००० मराठ्यांनी ८०००० मुघलांना कसे कापले होते हे तुम्हाला माहिती आहे का?आणि ज्या औरंगजेबाला पूर्ण देश घाबरायचा त्याच औरंग्याला त्याच्याच दरबारात हाणून पडून बोलून, छाती ताणून ,ताठ मानेन निघून जाणारा राजा मराठाच होता.आणि जेव्हा देशातील सर्व शूरवीर शेपूट घालून बसले होते.

तेव्हा घरापासून ८०० कोस दूर खुल्या मैदानात अफगानांना टक्कर द्यायला निघाले आणि जीवाची बाजी लावली ती मराठ्यांनीच............असे म्हटल्यावर तो जरा गप्प राहिला........तरी म्हणाला की लुटायची काय गरज असायची?

मी त्याला म्हणालो की,मराठ्यांनी लुटली ती त्या त्या राजाची संपत्ती,लुटला शत्रूचा आत्मविश्वास आणि अहंकार आणि त्याचा त्या परीसरावरचा अधिकार..मराठ्यांनी कधीही कोण्या शेतकरयला लुटले नाही,कोण्या सामान्य माणसाला त्रास दिला नाही,कधीही कोणत्याही स्त्रीची अब्रू लुटली नाही.................असे म्हटल्यावर त्याला बोलायला मार्ग राहिला नाही..........मित्रांनो तुम्हाला जर कुणी असे विचारले तर तुम्ही सुद्धा हेच उत्तर द्या...........
छ.शिवाजी महाराज की जय.....

जय भवानी...
जय शिवराय...
जय शंभूराजे...

छत्रपती शिवरायांच्या शस्त्रांपैकी ढाल,अंगरखा,बिचवा अशी अनेक शस्त्रे आज उपलब्ध नाहीत.परंतु त्यांच्या काही तलवारींपैकी तीन तलवारी जगदंबा,भवानी आणि तुळजा या आजही अस्तित्वात आहेत.वाघनखे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात आहेत. तलवारींपैकी जगदंबा हि तलवार लंडन मध्ये आहे.ती स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांनी पाहिल्याचे नमूद केले आहे.दुसरी भवानी तलवार सध्याचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे आहे,तर तुळजा तलवार हि सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात आहे.
माझ्या मागील लेखात जगदंबा आणि भवानी तलवार एकच असल्याचे नमूद केले होते त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे.
मराठा तलवार
मराठा तलवार
मराठा तलवार
मराठा तलवार
जगदंबा तलवार-
उगम – इ.स.१५१० साली आल्फोन्सो आल्बुकर्क याने गोवा जिंकला .त्याचा सेनापती डियागो फर्नांडीस याने लगेचच सावंतवाडीवर हल्ला केला,पण
हल्ला सपशेल फसला आणि पोर्तुगिजांचा दारूण पराभव खेमसावंत भोसल्यांनी केला.त्यावेळी हि पोर्तुगीज राजघराण्यातील (Imperial) तलवार खेमसावंत यांच्याकडे आली. (तलवारीच्या पात्यावर I.H.S. हि अक्षरे कोरली आहेत)
छत्रपतींना हि तलवार १६५९ साली भेट म्हणून देण्यात आली किंवा खेमसावंता वर झालेल्या जप्तीत ती छत्रपतींना मिळाली.

जगदंबा तलवार

जगदंबा तलवार
जगदंबा तलवार
जगदंबा तलवार

तलवारी संबंधीची करवीर संस्थानातील नोंद -
पंतप्रधान सरकार कदीम करवीर, शस्त्रागार तर्फे रावबहाद्दूर दादासो सुर्वे
नोंदणी जीनस – जगदंबा तलवार
जिनसाचे नाव | डाग आकार सहित | तपशील दास्तान | चालूकडे
तलवार सडक | १९७-११ | १९७-११ | हल्ली नाही
जगदंबा मेणावर
तपशील – नाकीत्यास हिरे ६,माणके ४४ ,पाचा १०
एकूण पराज हिरे १३,पाचा १८ , माणके ४६७
मिळून सबंध तलवार.
जगदंबा तलवार प्रतिकृती
जगदंबा तलवार प्रतिकृती
चौथे शिवाजी – प्रतापसिंहराजे भोसले यांनी हि तलवार प्रिन्स ऑफ वेल्स याला भेट दिल्याचे सांगण्यात येते.
भवानी तलवार – शिवछत्रपतींनी वापरलेल्या अनेक तलवारींपैकी हि एक, परमानंद नेवासकर कृत शिवभारत मध्ये “मी तुझ्या तलवारीमध्ये आशीर्वाद बनून राहीन” अश्या अर्थाचा श्लोक होता, त्याचे नंतर भवानी आईने तलवार दिली असे रुपांतर झाले.असो…
तर हि भवानी तलवार रायगड पडला तेव्हा झुल्फिकार खानच्या हातात पडली असावी.त्याचवेळी शाहू छत्रपती,येसूबाई राणीसाहेब व इतर लोक कैद झाले.औरंगजेबाने येसूबाई आणि शाहू महाराजांची विशेष बडदास्त ठेवली येसूबाई यांना स्वतः चा शिक्का व चरितार्थासाठी काही वतने दिली,तसेच शाहूंना “सरकार राजा शाहू ” अशी पदवी दिली.
नंतरच्या काळात शाहू महाराज मोठे झाल्यावर औरंगजेबाने त्यांचे धर्मांतर करण्याचे ठरविले परंतु शाहू आणि येसूबाई राणी साहेबांनी त्यास विरोध दर्शविला त्यामुळे औरंगजेबाने तो विचार सोडून दिला आणि शाहूंचे लग्न बहादुर्शहा च्या मुलीशी लावले
त्या लग्नप्रसंगी औरंगजेबाने भवानी तलवार,अफझलखानची तलवार आणि काही रत्ने शाहूंना भेट दिली.नंतर हीच तलवार शाहू महाराजांबरोबर सातार्यात आली,तीच तलवार सातारा छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर मध्ये आहे.त्यावर ‘सरकार राजा शाहू’ असे कोरले आहे.
तुळजा तलवार - तिसरी तलवार म्हणजे सिंधूदूर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदीरातील तुळजा फिरंग ही तलवार.सहजी महाराजांनी ती तलवार शिवाजी महाराजांना दिली असे सांगण्यात येते. यापैकी तिसरी तलवार असण्याची शक्यता इतिहास संशोधकांनी वर्तवल्यामुळे या तलवारीचं महत्त्व वाढलं आहे. या तलवारीला जतन कराण्यासाठी ती काचेच्या पेटीत ठेवण्यात आली आहे. तसेच पूजेसाठी तिची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे.
संदर्भ साभार – भवानी तलवार ब्लॉग
महाराष्ट्र टाईम्स
रॉयल एशियाटिक सोसायटी
औरंगजेबाचे अखबार
शिवकालीन शस्त्रे – पुरंदरे

शिवरायाचा मृत्यु कि खून ?


संभाजीराजे आणि सोयराबाई यांचे नातेसंबंध :-

१. सत्ताप्राप्तीसाठी शिवरायांचे कुटुंबात कोणत्याही प्रकारचा संघर्ष नव्हता. सोयराबाईनी संभाजीराजांना शेवटपर्यंत स्व:पुत्रा प्रमाणे सांभाळले. तर संभाजीराजे सोयराबाईना नेहमी " निर्मल मनाची आई " असे म्हणत.

२. सोयराबाई व शंभूराजे यांचे भांडण लावायचा प्रयत्न ‘धूर्त’ मंत्र्यांनी केला. पण त्यात त्यांना यश आहे नाही. या उलट संभाजीराज्यांनी स्वराज्याचे वाटणीस विरोध केला.

३. राजाराम यांना राजसाबाई यांचे पोटी पुत्र रत्न झाले . तेव्हा राजाराम यांनी पुत्राचे नाव संभाजी असे ठेवले ( १६९७ ) जर संभाजी व राजाराम यानमध्ये संघर्ष असता तर राजाराम यांनी मुलाचे नाव संभाजी असे ठेवले असते का ?

शिवरायांचा खून का व कसा झाला :--

हजारो वर्षांची स्वराज्या विद्रोह्यांची दादागिरी शिवाजीराजे व संभाजीराजे यांनी संपवली त्यामुळे काही मंत्री आतून प्रचंड चिडले. म्हणून त्यांनी राज्यांचे कुटुंबात भांडण लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

अपयश आले तरी मोरोपंत, अण्णाजी, राहुजी सोमनाथ थांबले नाहीत. शिवरायांना संपवायचेच हा पक्का निश्चय त्यांनी केला होता. आण्णाजी दत्तो रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला थांबला होता. गडावर राहुजी सोमनाथ हा अधिकारी होता. रायगडाची संपूर्ण नाकाबंदी करण्यात आली. कसल्याही प्रकारचा सुगावा लागणार नाही याची दक्षता या तिघांनी घेतली. म्हणून या कटाचा संशय येऊ नये यासाठी मोरोपंत आणि अण्णाजी दत्तो घटनास्थळा पासून दूर थांबले होते. हत्त्या करण्याचा कट रचणारे, प्रवृत्त करणारे जवळ थांबत नसतात. या प्रसंगी राज्यातील अत्यंत महत्वाची माणसे गडावर नव्हती. संभाजीराजे पन्हाळा गडावर होते. सेनापती हंबीरराव माहिते हे तळबीड या ठिकाणी होते. ते राजगड पासून २५० किलोमीटर आहे. शिवाजी महाराज यांचे कुटुंबातील सर्व नातेवाईक हे पाचाडला होते. असा स्पष्ट उल्लेख शिवभारतमध्ये आहे. ( संदर्भ :- वा.सी.बेंद्रे लिखित श्री. छ. संभाजी महाराज )

तीन एप्रिलचा दिवस उजाडला तेव्हा शिवरायांचे भोवती कपटी लोकांचे वलय होते. राहुजी सोमनाथने गडावरचे सर्व दरवाजे बंद केले. गडाची सर्व सूत्रे सोमनाथच्या ताब्यात होती. या सार्या परिस्थितीचा फायदा घेऊन शिवरायांवर विषप्रयोग झाला. संभाजीराजे व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना राज्यांचे खुनाची माहिती समजणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. राज्यांचा अंत्यविधी हा घाई घाईत उरकण्यात आला.

दहा वर्षाच्या राजारामला सिंहासनावर बसउन शिवद्रोही मंत्री सत्ता ताब्यात घेउ इच्छित होते. म्हणून त्यांनी दहा वर्षाच्या राजारामाच्या राज्याभिषेकाची बातमी फुटू न देता राज्याभिषेक उरकला. शिवरायांचा खून व राजाराम यांचा झालेला राज्याभिषेक चोरून लपउन केला गेला. हि बातमी रायगडावरून फुटणार नाही याची दखल घेतली गेली. लगेच विरोधी मंत्र्यांनी संभाजीराजे यांना पकडण्याचे ( अटक) करण्याचे आदेशपत्र हंबीरराव मोहिते यांना दिले.... पण हंबीरराव यांना शिवरायांनी खाजगीत संभाजीला छत्रपती करा असे सांगितले होते. राजाराम हा दहा वर्षाचा आहे त्याला राजाकरणे हे स्वराज्य कपटी मंत्र्यांचे हातात देणे होईल अशी सूचना शिवरायांनी पूर्वीच " राजारामाचे सख्खे मामा सेनापती हंबीरराव मोहिते " यांना केली होती. हंबीरराव यांना फुटीर मंत्र्यांचे पत्रं मिळताच त्यांनी संभाजीराजे यांना त्याची माहिती कळवली.

वरील प्रसंग सिद्ध करतो कि सोयराबाई यांचा सख्खा भाऊ हा स्वतःच्या भाच्याला छत्रपती करायची संधी डावलून स्वराज्याचे हित पाहतो. पहा नीट पहा विचार करा सोयराबाईया संभाजी विरोधक नव्हत्या याचा हा पुरावा नव्हे काय?
तरीही हा खून सोयराबाई यांनी केला अशी अफवा अजानकार इतिहासकारांनी नंतर उठवली.

जेव्हा शिवरायांचा खून झाला तेव्हा राज्यांचे वय हे अवघे ५० वर्ष होते. राज्यांना कोणताही असाध्य रोग नव्हता. ते प्रधीर्ग आजारी नव्हते. राज्यांची प्रकृती निरोगी होती. वयाचे ५० व्या वर्षी राज्यांना अनैसर्गिक मृत्त्यू येणे कदापीही शक्य नाही.

शिवरायांच्या मृत्त्यू बाबद संशय निर्माण करणाऱ्या काही बाबी :--
१. शिवरायांचे धर्म परिवर्तनाचे कार्य.
२. शिवरायांनी इतर कुटीर वर्चस्वाला दिलेला शह.
३. रायगडावरील मंत्र्यांचा अंतर्गत विरोध.
४. तीन एप्रिलचे गडावरील संशयास्पद वातावरण.
५. शिवरायांचा घाई घाईत उरकण्यात आलेला अंत्यविधी.
६. पराक्रमी, विद्वान,चारित्र्यसंपन्न, जेष्ठपुत्र संभाजीराजे यांना धोका देऊन कोणतीही चूक नसताना कैद करायचे आदेश देऊन.... दहा वर्षाच्या कनिष्ठ राजारामला घाई घाईत छत्रपती करण्यामागचा कपटी मंत्र्यांचा हेतू काय असावा ?
७. शिवरायांच्याखुनाची, राजारामाच्या राज्याभिषेकाची, माहिती गोपनीय ठेवण्या माघे ब्राह्माण मंत्र्यांचा काय हेतू होता ?
८. संभाजी महाराजांचे सांत्वन करण्यापेक्षा त्यांना अटक करायला गेलेले मंत्री यांचा हेऊ काय होता ?
9. या सार्या प्रकारा नंतर संभाजीराजे यांनी सोयराबाई यांना मान दिला, गौरवले व राजाराम महाराज यांना प्रेमाने वागवले....... तर त्या गद्दार मंत्र्यांना कैद केले व पुढे त्यांना हातीचे पायाखाली देऊन ठार केले. हे काय दर्शवते

संभाजी महाराज यांना अटक करा व आम्हाला वाटेत भेटा असे आदेश कुटील मंत्र्यांनी हंबीरराव मोहिते यांना दिले होते .पण संभाजी महाराज यांना कपटाने कैद करायला निघालेल्या मंत्र्यांना ( मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत..) हंबीरराव यांनी वाटेतच अटक केले ! त्यानंतर संभाजीराजे हे रायगडावर आले त्यांनी सर्व मातांचे सांत्वन केले.

सोयराबाई या निर्दोष होत्या हे सिद्ध करणारा एक भक्कम पुरावा म्हणजे संभाजीराजे २४ ऑगस्ट १६८० रोजी म्हणतात कि ' सोयराबाई या स्फटिका सारख्या निर्मल मनाच्या आहेत'. याचा अर्थ सोयराबाई या निर्दोष तर होत्याच पण त्या संभाजीराजे यांना आदर स्थानी होत्या. कुमंत्र्यांनीच सोयराबाई यांना संभाजी विरोधात भडकवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. [संधर्भ छ. संभाजी (पान २२१ ) वा. सी बेंद्रे.]

आता आपण शिवरायांचे मृत्युबाबत देशी आणि परदेशी साधनांचा विचार करू :--

पुढील संदर्भ साधनांची चिकित्सा करताना त्या साधनांचा काळ व कर्ता याचा विचार केलेला आहे. मराठी आणि संस्कृत साधनांचे लेखक हे एकाच जातीचे असल्याने सत्यशोधनात अडचणी येतात. तरी देखील अपराधीपणाची जाणीव त्या साधनात सापडते.

सुरवातीला आपण अमराठी साधने पाहूयात ......

१. इंग्रजांचे पत्र " शिवाजी महाराज यांचा मृत्यू रक्तातीसाराने झाला. "
२. पारसी कागदपत्र ( मासिरे आलमसिगरी - साकीमुस्तेखान ) " शिवाजी हे घोड्यावरून उतरले त्यांना अतिउष्णतेमुळे दोन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला "
३. निकोलोमनुची ( असे होते मोगल ) - " शिवाजीराजे यांना रक्ताच्या उलट्या होऊन मरण आले "
४. दाघ रजिस्टर ( डच कागदपत्र - १६८० (पृष्ठ ७२४.२९) संदर्भ परयीच्या दृष्ठी. ) - " राज्यांवर विषप्रयोग केला असावा "

शिवाजीराज्यांनी राजारामाचा विवाह १५ मार्च १६८० रोजी प्रतापराव गुजर यांचे मुलीशी लाऊन दिला आणि अवघ्या १८ दिवसात शिवाजीराजे यांचा खून झाला. शिवाजीराजे रक्ताच्या उलट्या होऊन मरण पावले हे सारे जाणतात पण त्यांना रक्ताच्या उलट्या का झाल्या ? हे मात्र सारेच जाणत नव्हते कारण शिवद्रोही मंत्र्यांनी रायगडावरून वाराही बाहेर जाणार नाही याप्रकारे बंदोबस्त केला होता.

आता आपण मराठी -संस्कृत साधने पाहू :----

१. शिवदिग्विजय - " सोयराबाईंकडून राज्यांना विषप्रयोग झाला "
२. चिटणीस बखर - " सोयराबाईवरच आरोप ठेवते "
३. जेधे शकावली - " चैत्र शुद्ध शनिवार दिवसा दोन प्रहरी रायगडावर शिवरायांचे निधन झाले हंबीरराव मोहिते यांनी मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत यांना कैद केले."

चिटणीस बखर,शिवदिग्विजय या १८१८ सालच्या असल्याने समकालीन नाहीत. पण त्या विषप्रयोग झाल्याचे बोलतात. फुटीरवादी मंत्र्यांनी विषप्रयोग केला पण सोयराबाई यांच्या नावाने अफवा पसरवली. हे वरील साधनांवरून लक्षात येते.

जेधे शकावली हि दैनंदिनी असल्याने स्पष्टीकरण नाही पण त्यात निधनानंतर लगेच मंत्र्यांना अटक केल्याचे स्पष्ट होत आहे. मंत्र्यांनी खून केला म्हणून त्यांना अटक केली असा स्पष्ट अर्थ निघतो.

बहुजन सामाज्याची दिशाभूल करण्यासाठी नंतर काही अजानकार इतिहासकरांनी शिवरायांचा मृत्यू हा " गुडघी रोगामुळे " झाला अशी अफवा पसरवली. (पण मित्रहो जगाच्या इतिहासात पूर्वी आणि आजही गुडघीरोग कोणालाही झाल्याचे उदाहरण नाही..) तर काही इतिहासकारांनी शिवरायांचा खून हा सोयराबाई यांनी केला असा कुप्रचार सुरु केला.

शिवरायांचा खून पचउन स्वराज्य हस्तगत करायचा कुटीर आणि गद्दार मंत्र्यांचा डाव होता त्यासाठी त्यांनी राजाराम यांचा राज्यभिषेक घाई घाईत उरकला.

कारण राजाराम हे १० वर्षाचे बालक होते. राजारामला नामधारी राजा करायचे व राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातात घ्यायची असा फुटीरवादी मंत्र्यांचा डाव होता. तसेच संभाजीराजे हे हुशार, धाडसी,पराक्रमी, होते म्हणून संभाजीराजे यांना अटक करायला मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत हे पन्हाळागडाकडे निघाले पण वाटेतच या कपटी, स्वराज्यद्रोही, नरपशूना.... स्वराज्यप्रेमी, शिवभक्त, राजाराम यांचे सख्खे मामा हंबीरराव मोहिते यांनी अटक केली आणि संभाजीराजे यांचा रायगडावर अभीषेक केला. !

तात्पर्य :-

विषप्रयोग झाला हे सारे जाणतात. काही गलीच्छ विचारांना बळी पडून सोयराबाई ही यात सामील होत्या असे समजतात. पण त्याच वेळी शंभूराज्यांनी सोयराबाई यांना कधीच अटकही केले नाही व कोणताही त्रास दिला नाही उलट खुणानंतर ५-६ महिन्यांनी संभाजीयांनी सोयराबाई यांना गौरवले त्याचा सन्मान केला ! याचा वर पुरावा दिलेला आहे. म्हणजेच सोयराबाई या निर्दोष होत्या हे कोणीही खरा शिवप्रेमी कबुल करेल. म्हणजेच शिवरायांचा खून हा केवळ स्वराज्य बळकावण्यासाठी मंत्र्यांनी केलेला कुटीरवादीकावा होता हे सिद्ध होते.

------------------------------

---------------------------------------------------------

तरीही काही लोक खालील शंका उपस्थित करू शकतात :------>

१. शिवरायांवर विष प्रयोग झाला का ?

------> परिस्थिती तशीच आहे.

सुरवातीला आपण अमराठी साधने पाहूयात ......
१. इंग्रजांचे पत्र " शिवाजी महाराज यांचा मृत्यू रक्तातीसाराने झाला. "
२. पारसी कागद पत्र ( मासिरे आलमसिगरी - साकीमुस्तेखान ) " शिवाजी हे घोड्या वरून उतरले त्यांना अतिउश्नते मुळे दोन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला "
३. निकोलो मनुची ( असे होते मोगल ) - " शिवाजीराजे यांना रक्ताच्या उलट्या होऊन मरण आले "
४. दाघ रजिस्टर ( डच कागदपत्र - १६८० (पृष्ठ ७२४.२९) संधर्भ परयीच्या दृष्ठी. ) - " राज्यांवर विष प्रयोग केला असावा "

वरील अमराठी साहित्य काय सांगते ?
शिवरायांना रक्ताच्या उलट्या झाल्या. हे कोणीही टाळू शकत नाही. शिवाजीराज्यांनी राजारामाचा विवाह १५ मार्च १६८० रोजी प्रतापराव गुजर यांचे मुलीशी लाऊन दिला आणि अवघ्या १८ दिवसात शिवाजीराजे यांचा मृत्यू झाला तोही रक्ताच्या उलट्या होऊन ! शिवाजीराजे रक्ताच्या उलट्या होऊन मरण पावले हे सारे जाणतात................. पण त्यांना रक्ताच्या उलट्या का झाल्या ? याचे उत्तर साहित्य त्यांचे भाषेत देते..
---------->

१. शिवदिग्विजय - " सोयराबाईंकडून राज्यांना विषप्रयोग झाला "
२. चिटणीस बखर - " सोयराबाईवरच आरोप ठेवते "

निष्कर्ष काय निघतो :--
१. कि सारे म्हणतात रक्ताचा उलट्या झाल्या.
२. दाघ रजिस्टर म्हणते विषप्रयोग झाला.

यातील कोणाकडे काहीही पुरावा नाही म्हणू हा गोंधळ होत आहे.

पण हे उघड आहे कि राजाराम यांचे लग्न झाले आणि १८ दिवसात शिवाजी वारले. लग्ना वेळी ते तंदुरुस्थ होते. कोणताही असाध्य रोग नव्हता. मग अचानक रक्ताच्या उलट्या का झाल्या ? या प्रश्नाचे उत्तर हेच आहे कि विषप्रयोग झाला.

2. मग नवीन प्रश्न निर्माण होतो कि तो कोणी केला ?

त्यासाठी आधी रायगडावर त्याप्रसंगा आधी परिस्थिती कशी होती हे पाहावे लागेल
रायगडावर शिवरायांचे घरात गृहकलश सुरु होता !! शिवाजी महाराज हे कोणी साधारण व्यक्ती नव्हते. महाराजांसारखे कुशल पारखी यांचे घरात गृहकलश !
ज्यांनी संपूर्ण भारतीय मूलनिवासी जनतेला एक जुठ केले , अनेक कुटुंबातील वाद आपल्या दरबारात योग्य न्यायाने मिटवले त्या महाराजांचे घरात गृहकलश !!! छे छे हे मनाला अजिबात पटत नाही ... ज्यांनी अफजलखानसारख्या महाकाय श्वापदाच्या आणि औरंगजेबासारख्या कुशाग्र बुद्धी असणाऱ्या बादशाच्या हातावर तुरी दिल्या. त्या महाराजांना आपल्याच घरातील वादावर हतबल व्हावे लागले हे मनाला पटत नाही. पण काय करणार भावना या भावनेच्या जागी राहतात आणि वास्तव हे वास्तव असते...... आणि वास्तव हेच आहे कि महाराज यांचे घरात गृहकलश होता !

गृह कलश होता हे वास्तव जड अन्तःकारणाने स्वीकारले तरी काही नवीन प्रश्न निर्माण होतात.गृहकलश काय होता ? त्याचे कारण काय ?
सोयराबाई यांना संभाजीराजे हे छत्रपती होणे पसंत नव्हते ! का ? तर त्यांचा १० वर्षाचा मुलगा त्यांना तेथे हवा होता !! पण राज्याभिषेकावेळी तर असे काही झाले नाही........ मग आताच का असे व्हावे कारण सोयराबाई यांचे मनात कोणीतरी विष कालवले..... मग हे विष कालवणारे कोण होते ? त्यांनी असे का केले ?
ते होते मंत्री........अण्णाजी दत्तो हे या कटाचे मुख्य सूत्रधार होते !!!! अण्णाजी दत्तो.. ज्या माणसाने एक दोन वेळा स्वराज्यसाठी तलवार हि उचलली तो अण्णाजी ! असे का वागला ?

कारण :---------->
A)संभाजी महाराज यांनी एक वेळा या आण्णाजीने केलेला भ्रष्टाचार उगडा केला होता ! त्याची बोच या अण्णाजी दत्तोच्या काळजात गेली होती.
B ) अण्णाजी दत्तोची विवाहित मुलगी हिचे संभाजी महाराज यांचे वर प्रेम होते ती त्यांचेकडे आकर्षित झाली होती. आणि त्यातून एक प्रसंगी तिने संभाजीराजे यांचे महालात जाऊन इच्छा व्यक्त केली होती. पण "पराविया नारी राखूमाई समान" या तुकोबांच्या विचारांशी नाते असल्याने व तसे संस्कार जिजाऊनी व शिवरायांनी केलेले असल्याने संभाजी महाराज यांनी तिला महालातून हाकलून दिले. त्यामुळे तिने स्वतःच्या कृतीचा पश्चाताप झाल्याने आत्महत्या केली. असे बरेच प्रसंग येथे देता येतील पण या दोन प्रसंगा वरून दत्तो का दात खाउन होता हे लक्षात येते.

शिवरायांवरील विषप्रयोगा आधीही काही मंत्र्यांनी बरेच वेळा शंभू महाराज यांना बदनाम करणे व संपवण्याचा प्रयत्न केला होता. सोयराबाई आधी त्यांनी शिवरायांचे मनात विष कालवायचे अनेक प्रयत्न केलेले होते.
तसेच शंभू महाराज यांना संपवण्याचे ही प्रयत्न याच मंत्री लोकांनी केले होते. सविस्तर माहितीसाठी आपण संभाजी ही कादंबरी वाचा.
तात्पर्य.....शिवरायांचे मंत्री हे कटकारस्थानी होते व त्यांनी संभाजी महाराज जिवंत असताना ही अनेक कारस्थाणे केली आणि ते शहीद झाल्यावर कारस्थानांचा वारसा त्यांचे वंशजांनी चालू ठेवला.

वर सिद्ध होते कि धूर्त मंत्री यांनी पहिल्यांदा शिवरायांचे मनात विष कळवायचा प्रयत्न केला. पण शिवराय यांचे स्वतःच्या पहिल्या मुलावर, स्वराज्याच्या भावी छत्रपतीवर प्रेम होते आणि असणार तसेच शिवराय हे दुसर्याचे ऐकणारे नव्हते , कान चुगल्याना बळी पडणारे नव्हते त्या मुळे धूर्त मंत्री यांचा हा प्रयोग फसला !

आता या मंत्री लोकांनी मोर्चा वळवला तो सोयराबाई यांकडे. सोयराबाई या सरळमार्गी,साध्या-भोळ्या,स्फटिक मनाच्या होत्या त्यांना या धूर्त मंत्र्यांच्या चाणक्यानीतीचा ठाव नव्हता. त्यामुळे त्या सुरवातीला या मंत्र्यांच्या कानचुगल्याना बळी पडल्या !!!

काही वेळ शिवरायांचे कुटुंबात वाद निर्माण झाला पण त्याला हे मंत्री जबाबदार होते. यासाठी पुरावा म्हणू संभाजीराजे यांचे पत्र घ्या.

संभाजीराजांचे 24 डिसेंबर 1680चे पत्र उपलब्ध आहे. त्यात ते म्हनतात ..
."राणीचे (सोयराबाईचे) मन स्फटिकासारखे निर्मळ होते. पण कुटिल मंत्र्यांनी दुष्ट सल्ला दिला की मोठ्या मुलाला गादी मिळता कामा नये. या सल्ल्याचा प्रभाव तिच्यावर पडला. "
आता हे स्पष्ट दिसत आहे कि शिवरायांचे घरात आणि संभाजीराजे यान वरील सर्व कटकारस्थानात फक्त आणि फक्त ब्राह्मण मंत्री होते ते अनेक वर्षापासून असे डाव आखत होते. त्या मंत्री गणाचे प्रतिनिधीत्व हे अण्णाजी दत्तो करत होते.

आता पुढे प्रश्न निर्माण होतो तो काय धूर्त मंत्री यांचे चाणक्यनीतीला बळी पडलेल्या सोयराबाई या विषप्रयोगात सामील होत्या ? काय त्यांना याची पुसटशी हि कल्पना होती ?

----> नाही ते शक्य नाही कारण "राणीचे (सोयराबाईचे) मन स्फटिकासारखे निर्मळ होते." असे खुद्द शंभू राजे बोलतात. अशी स्त्री असे करणे शक्य नाही. उलट त्यांना असा कट माहित असता तर त्यांनी पुढील घटना रोकली असती हे उघड आहे.

मग राहतात ते अण्णाजी दत्तो आणि त्यांचे सहकारी. बाकी कोणावर हि संशय घेता येणे शक्य नाही.

3. शेवटी आणखीन एक अण्णाजी दत्तो यांनी फार चुका केल्या हे कबुल पण काय ते शिवरायानवर विषप्रयोग करतील ?
---> हो ते करू शकतात.
कारण त्यांनी संभाजी महाराज यांवर विषप्रयोग केल्याचे इतिहासात दाखले आहेत पण ते फसले.
त्यांनी केलेल्या अनेक गुन्हे शंभू महाराज यांनी माफ करून हि अण्णाजी आणि कंपूने शिवरायांचे स्वराज्य हे मोगल पुत्र अकबराला विश्वासात घेऊन वाटून घेण्याचा कट केला होता. आणि आम्ही संभाजीला संपवायला तुम्हाला मदत करतो अश्या आशयाचे पत्र हि लिहिले होते मोगल पुत्राला ! पण त्यांचे दुर्दैव मागील कटात त्यांनी हंबीरराव यांना फितावण्याचा प्रयत्न केला व हंबीरराव यांनी त्यांनाच धडा शिकवला आता त्यांनी मोगल पुत्राला स्वराज्य वाटून घेण्याचे आमिष दाखवले पण याही वेळी मोगल पुत्र तडक शंभू राज्यांना हे पत्र देऊन मोकळा झाला ! आणि या शिवद्रोह्याना हत्तीचे पाया खाली द्यावे लागले.

आता तुम्हीच विचार करा :--
१. ज्या लोकांनी शिवरायाची शेवटची इच्छा (म्हणजे शंभूराजे यांना गादीवरबसवणे ) पूर्ण करायचे सोडून शंभूराज्यांना कैद करायचा कट केला.
२. एवढे होऊन हि शंभूराजे यांनी काही दिवस कारावास देऊन यांना मोकळे केले तर यांनी पुन्हा शंभू हत्तेचा कट केला. त्यातून सुटले
३. परत यांनी शिवरायांचे स्वराज्य मोगलाला फुकट वाटून देण्याचे पत्र दिले व शंभू महाराज यांना संपवण्याची इच्छा केली.

हे शिवरायांचे भक्त असतील का ? यांनी शिवरायांवर विष प्रयोग केला असणे शक्य नाही का ?

ll करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही ll
ll विझून माझी चिता युगे लोटली तरीही विझायचे राहिले निखारे अजून काही ll